|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीलक्ष्मीव्यंकटेश प्रसन्न ||
नमस्कार,
श्री. आणि सौ. कुलकर्णी संचालित ‘मंगलाक्षता ब्राह्मण वधु वर ऑनलाईन डिरेक्टरी’ मध्ये आपले स्वागत आहे.
जीवनातील सर्वात महत्वाच्या घटनांमध्ये ‘विवाह’ अग्रस्थानी आहे. लग्नगाठी स्वर्गात देवाने आधीच निश्चित केलेल्या असतात असे म्हटले जाते. मात्र ईश्वरनियोजित विवाहयोग प्रत्यक्षात जुळवून आणण्यासाठी मानवी प्रयत्न सुद्धा तितकेच आवश्यक असतात. यातील पहिली पायरी म्हणजे उपवर वधू-वर तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा परिचय होणे ही आहे. मराठी ब्राह्मण समाज हा अल्पसंख्य आणि विखुरलेला आहे. इतर अल्पसंख्य समाजाप्रमाणे मराठी ब्राह्मणांना एकत्र आणणारे सशक्त व्यासपीठ सध्यातरी उपलब्ध नाही. त्यामुळे मुलामुलींचे विवाह ठरविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रीय ब्राह्मण ज्ञातीमध्ये विवाहनिश्चितीच्या प्रक्रियेतील पहिल्याच पायरीवर अनेक निकषांची कसोटी लावली जाते. त्यामुळे एखाद्या स्थळाशी संपर्क साधण्यापूर्वीच त्या स्थळाची जास्तीतजास्त आणि खात्रीशीर माहिती मिळणे आवश्यक असते. या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी एक विश्वासार्ह आणि सुरक्षित माध्यम हवे असते. या हेतूनेच आम्ही ‘मंगलाक्षता ब्राह्मण वधु वर ऑनलाईन डिरेक्टरी’ तयार करण्याचे ठरविले आहे. ‘वधू-वर संशोधनासाठी साहाय्य करणे’ याकडे व्यवसाय म्हणून न पाहता आपल्या ज्ञाती बंधू-भगिनींच्या विवाहनिश्चितीच्या प्रक्रियेत शक्य तितके प्रामाणिक सहकार्य करावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जावा या हेतूने आम्ही ही डिरेक्टरी पब्लिश करीत आहोत. सेवेतील गुणवत्ता, विश्वासार्हता आणि सुरक्षितता या त्रिसूत्रीच्या आधारे मंचाचे धोरण ठरविण्यात आले आहे.
आपल्या ईश्वरनियोजित जोडीदाराची भेट या मंचाच्या माध्यमातून व्हावी, दोन कुटुंबांचे ऋणानुबंध जुळून येण्यासाठी आम्ही ‘निमित्तमात्र’ व्हावे यासाठी ईश्वरालाच प्रार्थना करतो आहोत.
आपणा सर्वाना अनेक शुभेच्छा!
आपले
सौ. वैष्णवी सदानंद कुलकर्णी
सदानंद राघवेंद्र कुलकर्णी
सदानंद कुलकर्णी सिव्हिल इंजिनिअर असून पुण्यात आर्किटेक्चर, ऑनलाईन कम्युनिकेशन, डिजिटल मार्केटिंग, ई-लर्निंग क्षेत्रात कन्सल्टन्ट म्हणून कार्यरत आहेत. सौ. वैष्णवी गृहिणी आणि लघुउद्योजिका आहेत.