आपली प्रोफईल फ्री रजिस्टर करा

आपली प्रोफाइल लाखो लाखो ज्ञाती बंधू-भगिनींपर्यंत पोचवा, अनुरूप स्थळांच्या प्रोफाईल्स पाहा, त्यांच्याशी संपर्क साधा, कोणत्याही अटी आणि मर्यादांशिवाय!

FAQs

मंगलाक्षता हे वधुवर सूचक मंडळ आहे का?

‘मंगलाक्षता’ हा उपवर ब्राह्मण वधू वरांच्या मेट्रोमोनिअल प्रोफाईल्स डिरेक्टरीच्या स्वरूपात पब्लिश करून याच ज्ञातीमधील इतर विवाहेच्छुकांपर्यंत पोचवणारा ‘ऑनलाईन पब्लिशिंग प्लॅटफॉर्म’ आहे. हे वधुवर सूचक मंडळ नाही. मंगलाक्षताकडून कोणालाही स्थळे सुचवली जात नाहीत अथवा दोन स्थळांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून काम केले जात नाही.

पूर्वीच्या काळी लग्न जमविण्याचे काम करणारी ‘मध्यस्थ’ ही संकल्पना काळाच्या ओघात नामशेष झाली आहे. त्यानंतर उदयास आलेली बहुतेक वधुवर सूचक मंडळे स्थानिक पातळीवर एका मर्यादेत काम करतात. याचबरोबर मोठ्या मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सच्या कामांमध्ये पारदर्शिता, खुलेपणा यांचा अभाव असल्याची तक्रार बहुतेक वेळा केली जाते. आधीच अल्पसंख्य असलेला मराठी ब्राह्मण समाज नोकरी-व्यवसायासाठी विखुरला गेला आहे. ब्राह्मण ज्ञाती एक समाज म्हणून एकसंघ नाही. यामुळे उपवर मुले आणि मुलींची लग्ने जमवताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून शहरे आणि ग्रामीण भागातील मराठी ब्राह्मण समाजातील उपवर मुले आणि मुलींची माहिती एकत्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती डिरेक्टरी स्वरूपात प्रसिद्ध करणे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय समस्त मराठी ब्राह्मण समाजापर्यंत पोचविणे या उद्देशाने ‘मंगलाक्षता’ ची स्थापना करण्यात आली आहे. हा एक वैयक्तिक उपक्रम आहे. 

मंगलाक्षताचे रजिस्टर्ड युजर होण्यासाठी आपणास स्वतःचा  बायोडाटा अर्थात प्रोफाइल मंगलाक्षता वेबसाईटवर पब्लिश करावी लागेल. यासाठी आपली वैयक्तिक माहिती, शिक्षण-उत्पन्न, जन्मपत्रिकेत डिटेल्स, जोडीदाराविषयीच्या अपेक्षा आणि आपली ओळख पटवून देणारे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. त्यानंतर आपली प्रोफाइल मंगलाक्षता वेबसाईटवर पब्लिश केली जाईल आणि आपला युजर आयडी-पासवर्ड दिला जाईल. लॉगिन करून आपण इतरांच्या प्रोफाईल्स पाहू शकता. अनुरूप प्रोफाईल्स सोबत संपर्क साधू शकता. इतर युजर्सही आपली प्रोफाइल पाहतील आणि आपल्याशी संपर्क साधतील. रजिस्ट्रेशन पेज ओपन करण्यासाठी कृपया इथे क्लीक करा

सायबर क्राईमच्या वाढत्या घटना पाहता स्वतःची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी मंगलाक्षता प्रोफाइलमध्ये संपर्कासाठी मोबाईलनंबर ऐवजी फेसबुक मेसेंजरचा वापर करण्याची आम्ही शिफारस करतो. विशेषतः मुलींच्या प्रोफाइलसाठी ही शिफारस आम्ही आवर्जून करतो. फेसबुक मेसेंजर हे व्हाट्सऍपप्रमाणेच काम करते. त्यातून मेसेजेस, फोटोज पाठवता येतात, व्हॉइसकॉल, व्हिडीओ कॉल करता येतात. मात्र यासाठी आपला मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला द्यावा लागत नाही. आपली ओळख पूर्ण उघड न करता सहजपणे संवाद साधता येणे हे मेसेंजरचे वैशिष्ट्य आहे. ते end to end encrypted असते. त्यामुळे आपल्या प्रोफाइलमध्ये विशेषतः विवाहेच्छुक मुलींच्या प्रोफाइलमध्ये मोबाईलनंबर ऐवजी फेसबुक मेसेंजर आयडी पब्लिश करण्याची शिफारस आम्ही करतो. यासाठी आपला मेसेंजर आयडी रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये द्यावा लागेल. आपला मेसेंजर आयडी कसा शोधायचा याची सचित्र माहिती इथे मिळेल.   

फ्री रजिस्ट्रेशन सुविधा मर्यादित काळासाठीच आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन सशुल्क असेल. 

रजिस्ट्रेशन केल्यापासून पुढे एक वर्ष आपली प्रोफाइल मंगलाक्षता वेबसाईटवर उपलब्ध असेल. दरम्यानच्या काळात आपली विवाहनिश्चिती झाल्यास कृपया आम्हाला व्हाट्सअप मेसेज अथवा ईमेलद्वारे कळवा. आपली प्रोफाइल हटविण्यात येईल.     

मंगलाक्षताच्या रजिस्टर्ड युजर्स खेरीज इतरांना विवाहेच्छुक उमेदवारांच्या प्रोफाईल्स पाहता येतील, मात्र यामध्ये उमेदवारांचे नाव, फोटोज आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स नसतील. केवळ रजिस्टर्ड युजर्सना लॉगिन करून संपूर्ण प्रोफाईल्स पाहता येतील. यामागे रजिस्टर्ड युजरच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण हा हेतू आहे. 

विवाहनिश्चिती हा दोन विवाहेच्छुक सज्ञान व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांमधील परस्परसमंतीने निर्माण होणारा ऋणानुबंध आहे. यामध्ये दोन्ही उमेदवारांचे शिक्षण, उत्पन्न, व्यक्तिमत्व, कौटुंबिक पार्श्वभूमी यांसह अनेक निकषांचा अंतर्भाव होत असतो. मंगलाक्षता हा मॅट्रिमोनिअल प्रोफाईल्स पब्लिशिंगचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्यामुळे विवाहनिश्चिती प्रक्रियेमध्ये मंगलाक्षताची कोणतीही भूमिका नसते. यामुळे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली विवाहनिश्चिती मंगलाक्षताच्या माध्यमातून होईल असा कोणताही दावा आम्ही करत नाही.

आपणास आणखी काही विचारायचे आहे का? लगेच मेसेज करा ...

मंगलाक्षताचे सिक्युरिटी आणि प्रायव्हसी फीचर्स

ऑनलाईन सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हा सर्वांचा घटनादत्त अधिकार आहे. आपण आपली स्वतःची ऑनलाईन सिक्युरिटी आणि प्रायव्हसी जशी जपतो तशीच काळजी आम्ही आमच्या रजिस्टर्ड युजर्सच्या प्रायव्हसीची घेतो. यासाठी ‘मंगलाक्षता’ ब्राह्मण वधू वर ऑनलाईन डिरेक्टरीच्या सिक्युरिटी आणि प्रायव्हसी पॉलिसीज मध्ये आम्ही खालील बाबींचा अंतर्भाव केलेला आहे. 

account verification

अकाउंट व्हेरिफिकेशन

नाव, जन्मतारीख, जात आणि कायमचा पत्ता यांची पुष्टी करणारी डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करताना अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय अकाउंट ओपन होणार नाही.

messenger-(1)

सुरक्षित संपर्क

आपली प्रायव्हसी आणि ऑनलाईन सिक्युरिटी लक्षात घेता प्रोफाइलमध्ये मोबाईल नंबर ऐवजी 'फेसबुक मेसेंजर आयडी' पब्लिश करा आणि त्याद्वारे सुरक्षित संवाद साधा

लिमिटेड ऍक्सेस

रजिस्ट्रेशन करून स्वतःची प्रोफाइल पब्लिश केलेल्यानाच इतरांच्या प्रोफाईल्स पाहता येतील. फक्त स्थळे पाहण्यासाठी कोणालाही अकाउंट ओपन करता येणार नाही

फोटोजची सुरक्षा

वेबसाईटला सहज भेट देणाऱ्या तिऱ्हाइतांना आपले फोटोज, विशेषतः उपवर कन्यांचे फोटोज का दिसावेत? म्हणून फक्त रजिस्टर्ड युजर्सनाच स्थळांचे फोटोज पाहता येतील.

error: Content is protected !!