फेसबुक मेसेंजर आयडी कसा शोधायचा?

आपल्या मोबाईल फोन मध्ये मेसेंजर हे ऍप इन्स्टॉल केलेले आहे याची खात्री करा. मेसेंजर इन्स्टॉल नसेल तर प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल करा. डाउनलोड लिंक सोबत दिलेली आहे. 

 

https://play.google.com/store/apps/details?id=com.facebook.orca 

मेसेंजर ऍप मध्ये लॉगिन करा, ते ओपन करा. त्यात खालील इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे तीन आडव्या लाईन्सवर टॅप करा.

यानंतर ओपन झालेल्या स्क्रीनमध्ये वरच्या उजव्या कॉर्नरला असलेल्या गिअर आयकॉनवर टॅप करा.

यानंतर ओपन झालेल्या स्क्रीनमध्ये Username वर टॅप करा.

यानंतर ओपन झालेल्या स्क्रीनमध्ये सर्वात वर आपल्या मेसेंजर आयडीची लिंक दिसेल ती कॉपी करण्यासाठी Copy link वर टॅप करा. यामुळे आपल्या फेसबुक मेसेंजर आयडीची लिंक कॉपी होईल.

कॉपी झालेली ही लिंक आपणास रजिस्ट्रेशन पेज मध्ये पेस्ट करावयाची आहे आणि हीच लिंक आपल्या प्रोफाइलमध्ये पब्लिश केली जाईल. कृपया रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये ही लिंक हाताने टाईप करू नका. लिंक अचूक टाईप झाली नाही तर त्यावर मेसेज (DM) पाठवता येणार नाही. म्हणून लिंक कॉपी करूनच रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये पेस्ट करावी.      

error: Content is protected !!