mangalakshata.com वेबसाईट ही महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीमधील विवाहेच्छुक स्त्री आणि पुरुष यांची विवाहविषयक माहिती (मॅट्रिमोनिअल प्रोफाईल्स) प्रसिद्ध करणारी ऑनलाईन डिरेक्टरी आहे. इथे विवाहेच्छुक स्त्री/ पुरुष स्वतः आपली मॅट्रिमोनिअल प्रोफाइल तयार करतात. प्रोफाइल तयार करणारी व्यक्ती ही प्रोफाइल क्रिएटर या नात्याने कार्यरत आहे. प्रोफाइल क्रिएटरने सबमिट केलेल्या प्रोफाईल्स पब्लिश करण्यासाठी mangalakshata.com वेबसाईटने केवळ मंच उपलब्ध करून दिला आहे.
प्रोफाइल क्रिएटरने आपल्या प्रोफाइलमध्ये दावा केलेली माहिती, जसे- प्रोफाइल क्रिएटरचे स्वतःचे शिक्षण, नोकरी, वेतन, उत्पन्न, मालमत्ता, वैवाहिक स्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, शारीरिक, मानसिक व्याधी, विकलांगता, जन्मपत्रिकेत तपशील या माहितीची पडताळणी mangalakshata.com व्यवस्थापनाकडून केली जात नाही. प्रोफाइलमध्ये प्रसिद्ध केलेल्या मजकुराची, त्यातील आशयाची संपूर्ण जबाबदारी ही त्या प्रोफाइल क्रिएटरची स्वतःची आहे.
mangalakshata.com वेबसाईटवर प्रोफाइल पब्लिश करण्यासाठी प्रोफाइल क्रिएटरने रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये आपली खरी माहिती देणे बंधनकारक आहे. ही त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. ही माहिती असत्य अथवा दिशाभूल करणारी आहे असे समजून आल्यास आणि फसवणूक झाल्याची भावना कोणाही व्यक्तीच्या मनात निर्माण झाल्यास त्या व्यक्तीकडून होणाऱ्या कायदेशीर कारवाईला प्रोफाइल क्रिएटर स्वतः जबाबदार असणार आहे.
प्रोफाइल क्रिएटरने सबमिट केलेली प्रोफाइल mangalakshata.com वेबसाईटवर पब्लिश करायची आहे अथवा नाही याचा निर्णय घेण्याचा तसेच पब्लिश झालेली कोणतीही प्रोफाइल वेबसाईटवरून केंव्हाही हटविण्याचा अधिकार वेबसाईट व्यवस्थापनाने स्वतःकडे राखून ठेवला आहे.
प्रोफाइल क्रिएटरने स्वतः साठी अनुरूप असलेल्या स्थळांच्या प्रोफाईल्स स्वतः शोधुन त्या स्थळांशी स्वतः संपर्क साधावयाचा आहे आणि विवाहीनिश्चीती करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न स्वतः करावयाचे आहेत. या कामी mangalakshata.com वेबसाईट व्यवस्थापनाची कोणतीही भुमिका आणि जबाबदारी असणार नाही. प्रोफाइल क्रिएटरने सबमिट केलेली प्रोफाइल प्रसिद्ध करणारा केवळ एक मंच म्हणून मंगलाक्षता वेबसाईट काम करेल. या व्यतिरिक्त कोणतीही सेवा mangalakshata.com वेबसाईटचे व्यवस्थापन देत नाही.
mangalakshata.com वेबसाईटवर पब्लिश झालेल्यापैकी कोणत्याही प्रोफाइल क्रिएटरसोबत विवाहनिश्चीती प्रक्रिया सुरु करण्यापूर्वीच संबंधित प्रोफाईल क्रिएटरने त्याच्या/ तिच्या प्रोफाइलमध्ये दावा केलेली सर्व माहिती विवाहनिश्चीती प्रक्रिया सुरु करणाऱ्या व्यक्तीने स्वतः तपासून पाहणे आणि त्या माहितीची सर्व बाजुंनी खातरजमा करणे ही संबंधितांचीच जबाबदारी असेल. mangalakshata.com वेबसाईट व्यवस्थापनाची यात कोणतीही भुमिका आणि जबाबदारी नसेल.
mangalakshata.com वेबसाईटवर प्रोफाईल पब्लिश झाल्यानंतर त्यातील विवाहेच्छुक उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, जातीचा तपशील, जन्मपत्रिकेचा तपशील, वैवाहिक स्थितीचा तपशील, रजिस्टर्ड ईमेल आयडी यात बदल करता येणार नाही.
पब्लिश झालेल्या प्रोफाइल मधील खालील बाबी अपडेट करता येतील. १: स्वतःचा फोटो बदलून त्या ठिकाणी स्वतःचा नवीन/ सुधारित फोटो पब्लिश करणे (एका वर्षात चार वेळा फोटो अपडेट करता येईल) २: नोकरीतील बदल (उदा: कंपनी, खाते, संस्था यांच्यात झालेला बदल, कार्यक्षेत्रातील बदल, पदोन्नती, वेतन/ पॅकेज मध्ये झालेला बदल, नोकरीच्या ठिकाणाचा बदल) ३: अतिरिक्त उत्पन्नातील आणि मालमत्तेतील बदल
वरिल पैकी कोणताही बदल प्रोफाइल क्रिएटरला स्वतः लॉगीन करून अपडेट करता येणार नाही. अपडेट करावयाच्या माहितीचा तपशील mangalakshata.com च्या व्यवस्थापनाला पाठवून द्यावा लागेल. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये व्यवस्थापनाकडून प्रोफाइल अपडेट केली जाईल.
mangalakshata.com वेबसाईटवर पब्लिश झालेली प्रोफाइल एक वर्ष कालावधीसाठी वेबसाईटवर प्रसिद्ध असेल. ठराविक कालावधीनंतर विवाहनिश्चिती झाली आहे का? तसेच आपली प्रोफाइल mangalakshata.com वेबसाईटवर प्रसिद्ध (published) ठेवायची आहे का याची विचारणा वेबसाईट व्यवस्थापनाकडून व्हाट्सऍप मेसेजद्वारे करण्यात येईल. त्यावेळी आपल्याकडून ‘हो’ अथवा ‘नाही’ असे प्रत्युत्तर येणे अपेक्षित आहे. आपल्याकडून कोणतेच उत्तर आले नाही तर mangalakshata.com वेबसाईटवर आपली प्रोफाइल published अवस्थेत ठेवण्यात आपणास स्वारस्य नाही आणि आपली प्रोफाइल वेबसाइटवरून हटविण्यास आपण संमती दिली आहे असे मानून आपली प्रोफाइल वेबसाईटवरून हटविण्यात येईल.
कोणत्याही कारणाने वेबसाईटवरून प्रोफाइल हटवायची असेल तर वेबसाईटच्या व्यवस्थापनाला ईमेल अथवा व्हाट्सऍप मेसेजद्वारे सूचित करावे लागेल. विवाहनिश्चिती झाल्याची सूचना वेबसाईटच्या व्यवस्थापनाला देणे ही प्रोफाइल क्रिएटरची स्वतःची जबाबदारी असेल. विवाहनिश्चितीची सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील २४ तासांत mangalakshata.com वरील आपली प्रोफाइल हटविली जाईल. यानंतर आपले अकाउंट आपोआप निष्क्रिय होईल.
वरील Terms and Conditions मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्याचा, नवीन कलम जोडण्याचा तसेच कोणतेही कलम काढून टाकण्याचा अधिकार mangalakshata.com वेबसाईट व्यवस्थापनाने स्वतःकडे राखून ठेवला आहे.