मंगलाक्षता वेबसाईटला भेट देण्यासाठी प्रत्येक वेळी ब्राऊजरमध्ये वेबसाईटचा ऍड्रेस टाईप करण्याची आवश्यकता नाही. आपण मंगलाक्षता वेबसाईटचा शॉर्टकट आपल्या मोबाईल फोनच्या होम स्क्रीनवर तयार करू शकता. यासाठी प्रथम वेबसाईट क्रोम ब्राऊजर मध्ये ओपन करा. यानंतर ब्राऊजर मध्ये वरील उजव्या कॉर्नरला तीन डॉट्स वर टॅप करा.
यानंतर आलेल्या मेन्यूमध्ये Add to Home Screen हे ऑप्शन सिलेक्ट करा.
मंगलाक्षता वेबसाईटचा शॉर्टकट आयकॉन तुमच्या मोबाईल फोनच्या होम स्क्रीनवर तयार केला जाईल. या शॉर्टकटवर टॅप करून तुम्ही इतर ऍप्स प्रमाणे मंगलाक्षता वेबसाईट केंव्हाही ओपन करू शकाल.
वेबसाईटमध्ये प्रत्येक वेळी लॉगिन करताना युजरनेम आणि पासवर्ड टाईप करण्याऐवजी आपण त्यांना ब्राऊजरमध्ये सेव्ह करू शकता. यासाठी प्रथम लॉगिन स्क्रीन मध्ये आपले युजरनेम आणि पासवर्ड टाईप करा. त्यानंतर त्याच ठिकाणी Remember Me हे ऑप्शन सिलेक्ट करा.
यामुळे आपले युजरनेम आणि पासवर्ड Google Password Manager मध्ये सुरक्षितपणे सेव्ह केले जाईल. लॉग आउट केल्यानंतर पुढील वेळी लॉगिन करताना Registered Email ID या फिल्ड मध्ये फक्त एकदा टॅप करा. यानंतर सेव्ह करून ठेवलेले आपले युजरनेम आणि पासवर्ड तिथे आपोआप एंटर केले जाईल आणि ते वापरून लॉगिन करण्याविषयी विचारले जाईल. तिथे Sign in वर टॅप करा.
शॉर्टलिस्ट केलेले स्थळ आपण बुकमार्क करून ठेवू शकता. यासाठी प्रथम लॉगिन करा. बुकमार्क करण्यासाठी त्या स्थळाची प्रोफाइल ओपन करा. प्रोफाइल पेजमध्ये दुसऱ्या फोटोच्या bottom ला Bookmark Profile या नावाचे बटन आहे, त्यावर टॅप करा. ते स्थळ तुमच्या बुकमार्क लिस्टमध्ये समाविष्ट केले जाईल.
बुकमार्क लिस्ट पाहण्यासाठी मेन्यूबार मध्ये सर्वात वर My Bookmarks या बटनवर टॅप करा.
आपण बुकमार्क केलेल्या सर्व स्थळांची लिस्ट ओपन होईल. या लिस्ट मधील युजर आयडीच्या नावावर टॅप करून पुन्हा आपण त्या स्थळाची प्रोफाइल ओपन करू शकता.
यासाठी बुकमार्क केलेल्या स्थळाची प्रोफाइल ओपन करा. दुसऱ्या फोटोखाली असलेल्या Bookmarked या बटनवर टॅप करा. ते स्थळ तुमच्या बुकमार्क लिस्टमधून काढून टाकले जाईल.
मंगलाक्षता वेबसाईटवरील एखाद्या स्थळाने आपल्याशी संपर्क साधल्यास त्यांच्या Profile ची लिंक शेअर करण्यास सांगा. जर ते त्यांची प्रोफाइल लिंक शेअर करू शकले नाही तर ते मंगलाक्षताचे रजिस्टर्ड युजर नाहीत. Profile लिंक दिल्यानंतर त्या स्थळाची अधिकृत प्रोफाइल तुम्ही लॉगिन करून पाहू शकता.